गावठी दारू अड्ड्यावर शिरगाव पाेलीसांचा छापा, 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट

0
48
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मावळच्या पुसाणे गावाच्या हद्दीत कंजार भट वस्त्ती शेजारी बेकायदा सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी कंजारभट वस्ती येथील गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसाणे गावाच्या हद्दीत बेकायदा गावठी दारूअड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. घटनास्थळी बेकायदेशीरपणे हातभट्टीची गावठी दारु तयार करण्यासाठी कच्चे रसायन आणि साहित्य हाेते. सुमारे सात लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.पाेलिसांनी देव शिवम राठोड आणि एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिरगाव पोलीस करीत आहेत. ही कारवाई वनीता धुमाळ (पोलीस निरीक्षक शिरगाव पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here