कर्जत : मिरचीच्या पिकात लावली गांजाची झाडे !

0
172
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कर्जत : तालुक्यातील आळसुंदे गावामध्ये शेतातील मिरचीच्या पिकात शेतकर्‍याने चक्क गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत सुमारे 4 लाख 29 हजार 820 रूपये किमतीचा 21 किलो गांजा जप्त केला आहे.

आळसुंदे ते कोर्टी रस्त्यावर आळसुंदे गावाच्या शिवारात गट नंबर 330 मध्ये एका व्यक्तीने शेतात मिरचीच्या पिकात गांजाची झाडे लावली आहेत, अशी माहिती कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक बळप यांनी पथकासह जाऊन थेट शेतात छापा टाकला.

यावेळी त्यांना मिरचीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी तात्काळ ती सर्व गांजाची झाडे उपटून आणली. सुमारे 21 किलो 49 ग्रॅम वजनाची चार लाख 29 हजार 820 रूपये रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. गांजा वीस हजार रुपये किलो आहे. याप्रकरणी गांजाची झाडे लावणारा बाळू मारुती गार्डी याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक प्रदीप बोर्‍हाडे, मंगेश नागरगोजे, पी. टी. भांडवलकर, शाहूराज तिकटे, कोल्हे, कोहक, सुपेकर, बेग यांच्यासह नायब तहसीलदार प्रदीप ठोंबरे, कामगार तलाठी मोराळे, यांच्यासह महसूल व कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी केली.

घनश्याम बळप यांची जोरदार सलामी
कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून घनश्याम बळप यांनी दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. यानंतर दोन दिवसात त्यांनी अवैध व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत या व्यावसायिकांना जोरदार सलामी देत इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here