दूधात भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध नष्ट, विक्रेत्यांचे धाबे दणाणले

0
154
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत, या उद्देशाने यंदा राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात दूधात भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.

याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ९ डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाइृ आढळून आली. रामटेकमध्ये २२५० लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. काही नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अपर जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष
अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत अपर पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि वैधमापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत. दूध संस्था, संकलन केंद्र्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर संबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. धडक मोहिमेद्वारे कुणालाही त्रास देण्चाचा उद्देश नसून दूध उत्पादक व दूध, दूग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी शुद्ध दर्जाचे दूध व दूग्धजन्य पदार्थ ग्राहकांना द्यावेत, हा यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी समितीकडे करावी तक्रार
दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या वापराच्या पॅकेट्सवर अथवा डब्यांवर तारीख स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. तपासण्यांमध्ये तसा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहन समिती सदस्यांनी केले आहे.

किटद्वारे जागेवर होते दूधाची तपासणी
तपासणी मोहिमेदरम्यान समितीचे सदस्य व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जागेवरच विशेष किटद्वारे दूधाची तपासणी करतात. दूधात भेसळ आढळून आल्यास दूध जागेवरच नष्ट करण्यात येते. किटद्वारे दूधातील यूरिया, स्टार्च, शुगर, सॉल्ट, आणि दूध पावडरचे प्रमाण तपासले जाते. प्रमाणापेक्षा जास्त भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास विक्रेत्यांवर कारवाई करून खटले दाखल करण्यात येतात.

दूधात पावडरची भेसळ
तपासणी मोहिमेदरम्यान काही ठिकाणी पॅकिंगवर मेड इन युरोप लिहिलेले पावडर दूधात मिसळले जात असल्याचे समितीला आढळून आले आहे. अशांवरही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here