आळसुंदे गावाच्या शिवारात छापा, ४ लाखचा गांजा जप्त

0
20
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील आळसुंदे गावाच्या शहराच्या पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत आळसुंदे ते कोटीं रोडचे बाजूस एक इसम याने त्याचे शेतात गांजा पिकाची लागवड केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत माहिती समजल्याने कर्जत पोलीसांनी आळसुंदे गावचे शिवारात कारवाई केली आहे. तेव्हा शेतात मिर्चीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करावयाचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here