फेरी बोट उलटून भीषण दुर्घटना, 26 प्रवाशांचा मृत्यू

0
169
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी दिल्ली : फेरी बोट उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. मागच्या तीन महिन्यातील ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे बोट उलटून अपघात झाला. या घटनेत 26 जणांचा बुडून मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत.बोट बुडाल्याची माहिती आपत्कालीन अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुले आहेत, जे नायजेरियातील नायजर राज्यातील मोकवा येथे बोटीतून प्रवास करुन जात होते.नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीच्या प्रांतीय प्रमुख झैनाब सुलेमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आतापर्यंत 30 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित लोकांना अजूनही शोध सुरू आहे. याआधी जूनमध्ये देखील अशीच भीषण दुर्घटना घडली होती. लग्नसमारंभ करुन घरी परतणाऱ्या बोटीसोबत दुर्घटना घडली आणि 100 अधिक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. जूनपासून ही दुसरी मोठी घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here