मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात

0
141
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी शहरात येणार आहेत. केंद्रीय गृहखात्याकडून त्यांचा दौरा निश्चित झाल्याचे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना कळविण्यात आले आहे.

अभाविपने एस. बी. कॉलेजमध्ये एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला गृहमंत्री शाह उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त सभा होईल. १६ रोजी दुपारी ३ वाजता विमानाने बिहारमधील दरभंगा येथून येतील. संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांचे विमानतळावर आगमन होईल. ५ वाजून ३० मिनिटांनी कार्यक्रमस्थळाकडे रवाना होतील. त्यानंतर ५:३० ते ६:३० वाजेपर्यंत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांचा वेळ आरक्षित आहे. ६ वाजून ४५ मिनिटांनी ते विमानतळावरून हैद्राबादकडे रवाना होतील. दरम्यान, गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत गरवारे स्टेडियमच्या बाजूला रिद्धीसिधी लॉनवर सभेचे नियोजन करण्भायात येणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here