शरद पवारांनी टाकला नवा डाव, बंडखोर आमदार परत येणार? अजितदादांचं टेन्शन वाढणार

0
311
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांना घेरण्यासाठी मोठा प्लान आखला आहे. अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून अर्ज करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषद सभापतीकडे हा अपात्रतेसाठीचा अर्ज केला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांची धाकधूक वाढल्याची माहिती आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी याआधीच अजित पवार (Ajit Pawar) गटातील ४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. पहिल्या अर्जामध्ये विक्रम काळे, सतीष चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांचा समावेश होता.

विशेष बाब म्हणजे, अपात्रतेच्या कारवाईसाठी एक अर्ज पुरेसा असताना, दोन स्वतंत्र अर्ज करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता यामागे शरद पवार यांची काही नवी खेळी आहे का? यासंदर्भातील तर्क-वितर्कांना विधान आलं आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून अपात्रतेचा अर्ज दाखल होताच अजित पवार गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.

दुसरीकडे अपात्रतेच्या कारवाईचा धसका घेतलेल्या काही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत संपर्क साधला असल्यातची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्याने अपात्रतेची नोटीस काढलेल्या आमदारांपैकी काही आमदार पवारांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गट अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अपात्रतेची कारवाई असलेले संबंधित आमदार माघारी आल्यास त्यांच्या अपात्रतेसंदर्भात पुनर्विचार होणार आहे. मात्र, मंत्री झालेल्या ९ जणांविरोधात राष्ट्रवादीची कारवाई कायम राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी बंडखोर आमदारांबाबत बोलताना रविवारी एक मोठं विधान केलं. “कळत नकळत आपल्यातील काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे, आम्ही कामाला लागतोय, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका मला आजही अनेकांकडून विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here