“शासन आपल्या दारी” १२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पाचोरा दौऱ्यावर.

0
90
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

“शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या माध्यमातुन राज्याचे मंत्रालय हे आपल्या मतदार संघात येणार आहे. राज्यातील तालुका पातळीवर पहिलाच कार्यक्रम घेण्याचा बहुमान हा आपल्याला मिळाला आहे.

या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, बहुमानाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि शासकिय योजनांची लयलुट करण्यासाठी मतदार संघातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले असून, १२ सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटिल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समीती सभापती गणेश पाटील, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, भैय्या पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, राजेंद्र पाटील, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. किशोर पाटील म्हणाले की, ९ सप्टेंबर रोजी होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रमाला १२ सप्टेंबर रोजी होणार असून राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस, अजित पवार यांच्यासह १० ते १२ मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातुन शासनाच्या सर्वच विभागातील विविध योजनांचा लाभ हजारो लाभार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. विविध शैक्षणिक प्रमाणपत्रे, दाखले लाभार्थ्यांना मिळवुन देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आपल्या मतदार संघाला मिळालेला हा एक बहुमान आहे. यावेळी भडगाव तालूक्यात होऊ घातलेली औद्योगिक वसाहत, भडगाव शहराच्यासाठीच्या १ कोटी १५ लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना यासह अनेक विकास कामांचे आॅनलाईन भुमीपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या बहुमानातुन मिळालेल्या संधीच सोन करण्यासाठी मतदार संघातील सर्व नागरीकांनी पक्षाचा झेंडा बाजुला ठेउन हा उत्सव साजरा करण्यासाठी याव अस भावनिक आवाहन आमदार यांनी केले. सोबतच मतदार संघात आलेल्या मान्यवरांना येथिल नागरिकांना येणार्‍या समस्या सांगत त्या सोडविण्यासाठीही मी प्रयत्नशिल राहिल असे सांगत प्रादेशिक परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय भडगाव येथे करणे, यावल येथे असलेल्या आदिवासी विकास मंडळाचे उपविभागिय कार्यालय, गिरणे वरील बलून बंधारे ऐवजी के. टी. वेअर बंधारे, हतनुर धरणाचे वाहुन जाणारे पाणी पाटणादेवी पर्यंत पोहचविण्याचा प्रकल्प अशा विविध योजनांची आज कीती गरज आहे. हे सांगुन ती कामे पदरी पाडण्यासाठी मी प्रयत्नशिल असून या कार्यक्रमास मतदार संघासह पंचक्रोषितील नागरीकांनी सहभागी व्हावे असे अवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here