अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे दिल्लीत आगमन, भारताकडून जोरदार स्वागत

0
105
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी दिल्ली- जी-२० शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचेही भारतात आगमन झाले आहे. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते दिल्ली विमानतळावर उतरले.

यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनरल व्ही. के. सिंह हे बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आलीये. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे. बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार आहे.जो बायडन पहिल्यांगाच भारतात आले आहेत. बायडन यांच्या येण्याबाबत सांशकता होती. शिवाय त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडन हे भारतात येतील का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले आहे.जो बायडन हे ज्या विमानातून आले आहेत, ते अत्यंत विशेष आहे. हवतून हवेत मारा करु शकणारं शस्त्रसज्य असं हे विमान आहे. राष्ट्राध्यक्षांना संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी या विमानात असल्याचं सांगण्यात येतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here