ठाकरेंना आव्हान. मतदारसंघात या अन् लोकसभा निवडणूक लढवून दाखवा; कुणी दिलं ओपन चॅलेंज?

0
141
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान देण्यात आलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि निवडणुकीची चिंता करू नये. त्यांनी स्वतः या ठिकाणी निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आमदार रवी राणा यांनी दिलं आहे.उद्धव ठाकरे यांनी स्वत: यावं अन्यथा आदित्य ठाकरे यांना अमरावतीला पाठवावं. मग बघूया काय होतं ते. कारण अमरावतीच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. इथली जनता आमच्यासोबत आहे, असंही रवी राणा म्हणालेत. खासदार संजय राऊत यांच्या निवडणूक लढण्याच्या इराद्यावरही रवी राणा यांनी भाष्य केलं आहे.

 

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. स्वत: संजय राऊत यांनीही पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू असं म्हटलं आहे. त्यावर संजय राऊत राज्यसभेवर मुश्किलने निवडून गेले आहेत. त्यांनी जनतेमध्ये जाऊन कामं केले पाहिजे, असं रवी राणा म्हणालेत.

 

पाच वर्ष संपल्यानंतर निवडणुकीची तयारी करणं आणि जनतेमध्ये जाऊन काम करण्यात फरक आहे. निवडणुकीची तयारी करण्यापेक्षा कोणत्या जिल्ह्यात निवडणूक लढवणार हे जाहीर केलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांना रवी राणा उद्देशून म्हणालेत.

 

अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील, असे बॅनर ठिकठिकाणी लावले जात आहेत. त्यावरही रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुणाचे कितीही पोस्टर लागले जोपर्यंत ते मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत ते केवळ पोस्टरच राहणार, असं रवी राणा म्हणाले.

 

खासदार नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली आहे. यावर बोलताना नवनीत राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलीस आयुक्तांना आम्ही तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिली आहे. या धमकी प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. ज्याप्रकारे धमकी येतात त्या प्रकारे कोणत्यातरी गॅंगला सुपारी दिली आहे का? कोणत्या संघटनेचा यात हात आहे का? हे तपासले पाहिजे, असं रवी राणा म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here