एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत.; मुलाच्या आजाराचा उचलला खर्च

0
141
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : पुण्यातील मयुर गायकवाड यांच्या दहा महिन्याच्या बाळासाठी (आधिराज गायकवाड) पुण्यातील एकनाथ शिंदे फाऊंडेशन देवदूत ठरले आहे. या दहा महिन्याच्या बाळाची योग्य पध्दतीने शाररीक वाढ होत नसल्याने या बाळासा शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यावेळी बाळाला दुर्मिळ आजार असून तातडीनं दोन इंज़ेक्‍शन देण्याची गरज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या इंज़ेक्‍शनची किंमत सुमारे एक लाख सहा हजार रूपये असल्याने एकनाथ शिंदे फाउंडेशन व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने या दोन्ही इंजेक्‍शन चा संपूर्ण खर्च करण्यात येणार आला.

 

दरम्यान, आपल्या मदतीने जर कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यापेक्षा मोठे सेवा समाधान नाही,हीच शिकवण लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिली असून हीच शिकवण शहर शिवसेनेच्या माध्यमातून आचरणात आणली जात असल्याचे शहर प्रमुख भानगिरे यांनी या बाबत बोलताना सांगितले तसेच बाळाची प्रकृती लवकर सुधारेल अशी प्रार्थनाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here