कांदा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारवर खुश झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमति शाह आणि पियुष गोयल यांच आभार मानत असल्याचे सांगितले.पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला.य ज्याचे स्वागतच करायला हवे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्र सरकारने शेतकऱ्याचा कांदा 2,410 रुपये/क्विंटल दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल ते बोलत होते.