2023च्या विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला चौथ्या क्रमांकाचे कोडे सोडवण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. कारण आशिया कप 2023 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारेही संघ ही समस्या सोडवू शकतो.आशिया कप 2023 साठी निवडण्यात आलेल्या संघात श्रेयस अय्यर, केएल राहुल, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा मधल्या फळीत समावेश करण्यात आला आहे. यापैकी कोणीही 4 क्रमांकाची रिक्त जागा भरू शकते. डावखुरा फलंदाज तिलक वर्मा अद्याप एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही, पण त्याला संघात स्थान मिळाले आहे. यावर माजी फलंदाज संजय मांजरेकर यांने मोठे वक्तव्य केले आहे.
Chess World Cup 2023: दिग्गज खेळाडूला धोबीपछाड देत प्रज्ञानानंदा फायनलमध्ये; विश्वविजेत्या कार्लसनला देणार आव्हान
भारताने आशिया कप संघाची घोषणा केल्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तिलकचा भारतीय संघात समावेश झाल्यानंतर अभिनंदन केले. विशेष म्हणजे मांजरेकर यांनी तिलकच्या पांढऱ्या चेंडूच्या खेळीवर टीका केली. भारतासाठी पदार्पणाच्या मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवल्यानंतर, युवा खेळाडू तिलकने आयर्लंडमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष केला.
Jyoti Yaraji: आता अपेक्षा ज्योती यराजी हिच्याकडून; जागतिक ॲथलेटिक्स – प्राथमिक फेरीतच कडवे आव्हान असणार
मांजरेकर म्हणाले की, होय, कारण तो जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीकडे लक्ष द्या, तो भारतासाठी खेळण्यासाठी पात्रता आहे. तसेच, टी-20 फॉरमॅटमधील त्याच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला त्यानंतर ही 50 षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज होत आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याच्यामध्ये कमजोरी शोधणे कठीण आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे, नंबर चार, पाच आणि सहा वर थोडा प्रभाव टाकूया, दर्जेदार खेळाडू ठेवा. भारतीय क्रिकेटमध्ये क्रमांक एक, दोन आणि तीनसाठी प्रचंड गर्दी आहे, या चार, पाच, सहा फलंदाजांना तिथेच ठेवूया.