काँग्रेस कार्य समितीत विदर्भातील चार चेहरे; पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

0
75
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस कार्य समितीची (सीडब्ल्यूसी) घोषणा केली असून, विदर्भातील चार नेत्यांची नावे या यादीत आहेत. यात मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे व यशोमती ठाकूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.२०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या यादीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.

 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कॉग्रेस कार्य समितीतील सदस्यांची नावे अंतिम केली असून, सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी यादी घोषित केली. यात ३९ सदस्य, १८ स्थायी आमंत्रित सदस्य, १४ प्रभारी तर ९ विशेष आमंत्रित सदस्य आहेत. मुकुल वासनिक व अविनाश पांडे यांचे नाव काँग्रेस कार्य समितीच्या सदस्यांमध्ये आहे, तर प्रभारींमध्ये माणिकराव ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. यशोमती ठाकूर यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेस कार्य समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्य समितीमध्ये विदर्भातील चार नेत्यांचा समावेश झाल्यामुळे विदर्भातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, विदर्भातील काही नेत्यांना यात नाव असेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचे नाव यादीत येऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here