दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली सरकारमधील महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी संबधित अधिकाऱ्याला अटक न केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत होत्या.
दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही पोलिसांना नोटीस जारी करत याप्रकरणात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यास अटक केली आहे.
या अधिकाऱ्यावर त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबधित प्रकरणात पोलिसांनी २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. पण आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पत्नीचीही साथ; महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्याविरोधात FIR दाखल
पीडित मुलगी तिच्या वडिलांच्या निधनानंतर आरोपी व्यक्तीच्या घरी राहात होती. आरोपीने अल्पवयीन पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यातून, ती युवती गर्भवती राहिली होती. त्यानंतर, आरोपी अधिकाऱ्याच्या पत्नीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी दिल्ली सरकारने दखल घेत चौकशी करुन आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. संबधित प्रकरणात दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी ट्विट करुन घटनेची माहिती दिली होती.