श्रीरामपूर : रंधा धबधब्यामध्ये बुडून तरूणाचा मृत्यू

0
59
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

श्रीरामपूर अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाहण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील तरूणाचा रंधा फॉलमध्ये पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.सुमित बाबासाहेब वाघमारे (वय 21) असे या तरूणाचे नाव आहे. सुमित हा आपला चुलत भाऊ सुशांत राधाकिसन वाघमारेसह शिर्डीच्या अन्य मित्रांसह पर्यटनासाठी भंडारदरा धरणावर गेला होता. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान रंधा फॉल या ठिकाणी सेल्फी काढत असताना तोल जाऊन धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला. तात्काळ या संदर्भात स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी शोध घेतला असता संध्याकाळी उशिरा सुमितचा मृतदेह सापडला.

 

घटना घडल्यानंतर लगेचच दत्तनगर येथील राधाकिसन वाघमारे व कामगार नेते बबन माघाडे , अशोक पवारसह अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा ओळख पटवून संबंधित युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. काल रविवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

 

धम्मदिप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधाकिसन वाघमारे यांचे पुतणे व तक्षशिला बुद्ध विहारचे विश्वस्त बाबासाहेब वाघमारे यांचा सुमित मुलगा होता. सुमित वाघमारे हा दत्तनगर परिसरातील अत्यंत हुशार तरुण होता तो एमआरआय टेक्निशन होता, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो जॉब करीत होता. त्याचे पश्चात आई-वडील भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. गेल्या चार दिवसापूर्वीच नाशिक येथील युवक रंधा धबधब्यात पडला होता. परंतु त्याचे नशिब बलवत्तर असल्याने तो वाचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here