विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलो अलर्ट

0
72
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर – अनेक दिवस रूसलेला पाऊस दाेन दिवसापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेले पावसाचे धुमशान शनिवारीही कायम हाेते. २४ तासात जाेर काहीसा मंदावला असला तरी सर्वदूर हजेरी लावली असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नागपुरात सकाळपासून पावसाची संथगती रिपरिप चालली हाेती. दुपारनंतर अचानक जाेर वाढला व तासदीड तास जाेराच्या सरी बरसल्या. २४ तासात २९.६ मि.मी पावसाची नाेंद झाली. हा पाऊस कुही, भिवापूरसह इतर तालुक्यातही सक्रिय हाेता. गडचिराेली जिल्ह्यातील धानाेरा येथे सर्वाधिक ९०.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गडचिराेली शहरात दिवसा जाेर कमी झाला पण रात्रीच्या धुवांधार हजेरीमुळे २४ तासात ८६ मि.मी. पाऊस झाला. भंडारा, गाेंदियातही जाेरदार हजेरी लागली. चंद्रपूरमध्ये सकाळपर्यंत ५८ मि.मी तर शनिवारी दिवसा २३ मि.मी. नाेंद झाली. अकाेला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाण्यातही चांगल्या पावसाची नाेंद झाली आहे.

 

हवामान विभागाने रविवारीही जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त करीत येलाे अलर्ट दिला आहे. त्यानंतर मात्र उघडीप मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या पावसामुळे सरासरी तुट घटली असून सामान्य स्थिती कायम आहे. अकाेला, अमरावती व बुलढाणा मात्र अद्याप सरासरीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी खाली आहे.

 

राज्यात पावसाची स्थिती

सरप्लस जिल्हे : नांदेड, पालघर, ठाणे

सामान्य (ग्रीन झाेन) : यवतमाळ, भंडारा, गडचिराेली, चंद्रपूर, नागपूर, गाेंदिया, वर्धा, वाशिम (विदर्भ), जळगाव, नंदूरबार, नाशिक, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, काेल्हापूर, सिंधूदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, साेलापूर.

ऑरेंज झाेन : अकाेला, अमरावती, बुलढाणा (विदर्भ), हिंगाेली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे (मराठवाडा), अहमदनगर, सातारा, सांगली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here