“कोण म्हणतं आपल्याकडे नंबर 4 चा फलंदाज नाही?” दादाचा संतप्त सवाल

0
91
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय.असे असले तरी भारतीय संघाचा क्रमांक चारचा फलंदाज कोण? हा प्रश्न अनुत्तरीत दिसून येतो. याच मुद्द्यावर जोरदार चर्चा होत असताना भारतीय संघाचे माजी कर्णधार व माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

2019 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या वनडे विश्वचषकात देखील भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ही समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी विजय शंकर, केएल राहुल व रिषभ पंत असे तीन पर्याय दहा सामन्यांमध्ये चाचपले गेले. मात्र, यापैकी एकही जण त्या क्रमांकावर अर्धशतक ही झळकावू शकला नव्हता. आता देखील काहीशी तशीच परिस्थिती दिसून येते.

 

मागील विश्वचषकानंतर या क्रमांकावर सर्वाधिक खेळलेला श्रेयस अय्यर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. केएल राहुल दुखापतीतून सावरत असून, त्याला या क्रमांकावर संधी मिळते का ते पाहावे लागेल. सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन हे छाप पाडण्यात यशस्वी ठरले नाही. असे असताना गांगुली म्हणाले,

 

“कोण म्हणते आपल्याकडे क्रमांक चार वर फलंदाजी करणारा फलंदाज नाही? मला वाटते की, आपल्याकडे खूप सारे पर्याय असून, त्याकडेच सकारात्मकतेने पाहावे. युवा तिलक वर्मा व यशस्वी जयस्वाल यांना अधिक अनुभव नसला तरी, ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. ते संघाचा भाग असायला हवेत.”

 

सध्या तरी बीसीसीआय वेट अँड वॉच भूमिकेत असून, श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास तो या क्रमांकावर खेळताना दिसेल. अन्यथा सूर्यकुमार यादव याला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. अगदीच आश्चर्याचा धक्का देत निवड समिती तिलल वर्मा याला विश्वचषकात स्थान देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here