नागपूरमध्ये डेंग्यूमुळं एकाचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

0
68
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. कामठी तालुक्यातील येरखेडा इथं एकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सतीश पाटील असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान, डेंग्यूचा प्रसार होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

दरम्यान, शुक्रवारीच सतीश पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळं त्यांना कामठी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी त्यांना नागपूर इथं रेफर केले होते. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. सतीश हे केबलचे काम करत होते. नागपूर शहरात जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या 566 असताना आता त्यामध्ये मागील 15 दिवसांत 1 हजार 245 संशयित रुग्णांची भर पडली आहे. सध्या 1 हजार 801 रुग्ण आहेत. या रुग्णांची लक्षणे डेंग्यूसारखीच असल्यानं घराघरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

पावसाळ्यात विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असते. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळते.

डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते.

 

डेंग्यूची लक्षणं काय?

 

अचानक थंडी वाजून ताप येणे.

डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं.

मळमळ होणं, अंगावर सूज आणि चट्टे येणं

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणं दिसू लागतात आणि 2 ते 7 दिवसांपर्यंत असतात. डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. पण लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार म्हणजे ताप किंवा अंगदुखी पाहून तशी औषधं दिली जातात. जर प्रकृती गंभीर असेल तर रुग्णालयात भरती करावं लागू शकतं. डेंग्यूच्या रुग्णाला विश्रांतीची सर्वांत जास्त गरज असते. तसंच भरपूर पाणी पिण्याचीही, म्हणजे अंदाजे दिवसाला तीन लीटर पाणी प्यायला हवं. तसंच रुग्णानं साधा आहार घ्यावा लागतो. डेंग्यू तापामुळे शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते. साधारणपणे एक घन मिलीलीटर रक्तात 1.5 लाख ते 4.5 लाख प्लेटलेट्स असणं गरजेचं असतं. पण डेंग्यूमध्ये या प्रमाणावर सतत लक्ष ठेवावं लागतं बांगलादेशात डासांची दहशत! डेंग्यू झाला जीवघेणा, एका दिवसात सर्वाधिक लोक रुग्णालयात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here