मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. मात्र, महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येणार का? याची चर्चा सुरु आहे.प्रकाश आंबेडकर यांनी मी महाविकास आघाडीसोबत आलो तर ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांना चालणार आहे का? असा थेट सवाल केला होता. तर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. यावर खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
देशात विरोधी पक्षांनी INDIA ही नवी आघाडी स्थापन केली आहे. INDIA याला बळ मिळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी INDIA सोबत यावे असे काँग्रेस नेत्यांना वाट आहे. त्यात अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे वक्तव्य केले होते.