डॉ. व्यंकट राठोड यांची शेतकरी कुटुंबाला सांत्वनपर भेट तभा वृत्तसेवा

0
138
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

तभा वृत्तसअतिवृष्टीमुळे शेत खरडून गेल्याने कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत सापडून तिवरंग येथील नैराश्यग्रस्त शेतकर्‍याने आत्महत्या केली हो ती.या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सांत्वनपर भेट घेतली.

 

सततची नापिकी, त्यात भर म्हणजे जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पुराने सर्वच शेती खरडून गेली. त्यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा वाढता डोंगर कसा कमी करायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत महागाव तालुक्यातील तिवरंग येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव संभाजी वाघमारे (वय 52) यांनी गुरुवार, 10 ऑगस्ट रोजी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती.Venkat Rathod’s या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची उपविभागीय अधिकारी डॉ. राठोड यांनी सांत्वनपर भेट घेतली. या पीडित परिवाराच्या समस्या जाणून घेत त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारी सर्व मदत करण्याची ग्वाही दिली.

 

  1. शेतकर्‍यांनी आलेल्या परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे परिवाराची होणारी आबाळ लक्षात घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर उभे राहण्याची गरज असून शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे डॉ. व्यंकट राठोड यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यासह वाघमारे परिवारातील सदस्य व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here