पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या अररियामधील दैनिक ‘अखबार’चे पत्रकार विमल यादव यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, विमल यादव यांचा त्यांच्या शेजार्यांशी जुना वाद होता. त्यातून ही हत्या झाल्याची शक्यता आहे.