गोविंदा मंडळांमध्ये दुफळी; ‘हे’ आहे कारण

0
58
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

दहीहंडी उत्सव हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय. येत्या सात सप्टेंबरला असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या तोंडावरच राज्यातल्या दहीहंडी मंडळांमध्ये दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या सुमारे 342 मंडळांनी एकत्र येवून दहीहंडी असोसिएशन विरोधात आवाज उठवला आहे.राज्य दहीहंडी मंडळात सुमारे 500 दहीहंडी मंडळांचा समावेश आहे.

 

मुंबई : गेल्या 30 ऑक्टोबर रोजी दहीहंडी समन्वय समितीची सभा पार पडली होती. या सभेमध्ये काही गोविंदा मंडळानी प्रश्न विचारले असता अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गोविंदा मंडळांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याबाबत सुनावले होते. अधिकृत सभासद नसल्याचे कारण देत त्याना प्रश्न विचारण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर सर्व गोविंदा मंडळांनी वारंवार या पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, आम्हाला अधिकृत सभासद करून घ्या. परंतु आत्तापर्यंत गेले आठ नऊ महिने सभासद करून घेतले नाही. त्यामुळे ह्या सर्व गोविंदा मंडळांनी एक आवाज उठवला. या आवाजातून सर्वसामान्य गोविंदांचा बाळगोपांळाचा आवाज म्हणजे नवीन संघटना दहीहंडी असोसिएशन निर्माण झाली असल्याचे, सरचिटणीस कमलेश भोईर यांनी सांगितले.

 

नव्या गोविंदा असोसिएशनची स्थापना : कमलेश भोईर म्हणाले की, दहीहंडी असोसिएशन सर्वसामान्य गोविंदांचा हक्काचा आवाज असेल आणि या संघटनेचे नाव असेल दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र. या दहीहंडी असोसिएशनचे पहिले उद्दिष्ट आहे की, ह्या वर्षी बाळ गोपाळ हा शून्य अपघाताने आपला दहीहंडी उत्सव साजरा करतील. जे मोठ्या गोविंदा मंडळाचे प्रशिक्षक आहेत ते प्रत्येक विभागात जाऊन छोट्या छोट्या गोविंदा पथकांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘माझा गोविंदा माझा सुरक्षित गोविंदा’ याप्रमाणे गोविंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच पुढे होणाऱ्या साहसी क्रीडा प्रकारासाठी सुद्धा दहीहंडी असोसिएशन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे, जसे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर सहा-सात तर या छोट्या छोट्या गोविंदांना सुद्धा घेऊन प्रो गोविंदा करायचा विचारात आहे.

 

शालेय अभयासक्रमात समावेश व्हावा : दहीहंडी व साहसी क्रीडा प्रकार हा शालेय स्तरावर जाण्यासाठी त्याचा शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमामध्ये क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर समन्वय साधणार असल्याचे भोईर म्हणाले. शालेय शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण हा विषय जर समाविष्ट झाला तर, साहसी क्रीडा खेळाचे शालेय स्तरावर आयोजन केले जाईल. यातून चांगले खेळाडू महाराष्ट्राला लाभतील असेही भोईर यांनी सांगितले. दरम्यान मुळ दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्बात काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here