‘या’ टॉप अभिनेत्रींनी नाकारला होता ब्लॉकबस्टर गदर; कारण वाचून बसेल धक्का

0
369
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ऑगस्ट : गदर: एक प्रेम कथा प्रदर्शित होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे आणि पुन्हा एकदा सनी देओलच्या चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलचा ‘गदर: एक कथा’ हा चित्रपट त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.आताही २२ वर्षांनी पुन्हा तीच जादू अनुभवायला मिळत आहे. आजही गदर 2 पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये तुफान गर्दी करत आहेत. अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब असलेल्या अमिषा पटेलने या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की अमिषा पटेलच्या आधी हा चित्रपट आणखी काही बॉलिवूड अभिनेत्रींना ऑफर झाला होता मात्र त्यांनी या चित्रपटाला नकार दिला होता.गदर 2 मध्ये सनी देओलची हिरोईन बनण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी नकार दिला होता.

 

खुद्द दिग्दर्शकानेच याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी, ‘ते नाव जाहीर करणार नाही पण अनेक महिला कलाकारांनी काही कारणांमुळे हा चित्रपट नाकारला होता.’ असा खुलासा केला आहे.’तर तो मेकॅनिक असता…’ अभिषेक बच्चनने ‘या’ अभिनेत्याविषयी केलं मोठं वक्तव्य; नाव वाचून व्हाल चकितअमिषाआधी काजोलला या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला होता का, असे विचारले असता, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने बॉलीवूड बबलला सांगितले, ”मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, हे योग्य नाही. मीडिया कोणाचंही नाव घेऊ शकते. पण त्या काळातील अनेक टॉप अभिनेत्रींना आम्ही संपर्क साधला.

 

काही अभिनेत्रींना असं वाटलं की आम्ही त्यांच्या लायकीचे नाही. सनी देओल त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे आयुष्य जगत नाही असा त्यांचा समज होता. आमच्यासाठी त्या खूप मोठ्या आहेत, आम्ही ‘ट्रेंडी’ नाही असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी चित्रपटाची कथाही न ऐकता नकार दिला होता.” असं ते म्हणाले.गदरचे दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘आमची कथा ऐकलेल्या काही अभिनेत्रींना वाटले की ही एक पीरियड फिल्म आहे त्यामुळेच त्यात अभिनय करणं योग्य ठरणार नाही.

 

त्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटांचे चित्रीकरण होत असे. ते आम्हाला ‘युवाभिमुख’ चित्रपट बनवायला सांगायचे आणि तशाच काही ना काही बहाणा देऊन त्यांनी चित्रपट नाकारला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काजोलशिवाय ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनीही ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाला नकार दिला होता. या सर्व आघाडीच्या अभिनेत्रींनंतर अमिषा पटेलने अखेर पडद्यावर पाकिस्तानची सकीना होण्याचे मान्य केले. 2001 मध्ये आलेला हा चित्रपट 1994 च्या हम आपके है कौन नंतर 90 च्या दशकातील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला.आता 22 वर्षांनंतर दिग्दर्शकाने गदर 2: एक प्रेम कथा सादर केली आहे, ज्याला लोक पूर्वीच्या चित्रपटाप्रमाणेच प्रेम देत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रजनीकांतच्या जेलर आणि अक्षय कुमारच्या OMG 2 ला टक्कर देत आहे. सनी आणि अमिषासोबत या चित्रपटात उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, लव सिन्हा आणि मनीष वाधवा यांच्याही भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here