लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

0
96
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी मुंबई : घणसोली येथील तरुणाने पावणेतील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.राहुल मछिंद्र कणसे (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो घणसोली सिम्प्लेक्स येथे राहणारा आहे. बुधवारी त्याने पावणे येथील हायवे टच या लॉजमध्ये रूम घेतली होती. त्याठिकाणी तो एकटाच थांबला होता. रात्री उशिरापर्यंत त्याने रूम न सोडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला असता आतून प्रतिसाद मिळत नव्हता.

 

यामुळे त्यांनी पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली असता त्यांनी रूमचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये बेडशीटने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याच नैराश्यात त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here