पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्रात असा आहे हवामानाचा अंदाज

0
184
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

‘अजून आठवडाभर पावसाची शक्यता कमीच’

ऑगस्टचा तिसरा आठवडा सुरू होत असला तरी राज्याच्या अनेक भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात अद्यापही १०० टक्के पेरण्या झालेल्या नाहीत.

तर, जिथे पेरण्या झाल्या आहेत तेथे दुबार पेरणीचे संकट आहे. परिणामी, सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहेत. आता आपण या आठवड्याचा महाराष्ट्रासाठी काय अंदाज आहे ते पाहूया..

माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

उद्या रविवार दि.१३ ऑगस्टपासुन पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. २० ऑगस्ट पर्यन्त ‘ मान्सून खण्ड ‘ प्रणालीमुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र केवळ मध्यम पावसाची शक्यता ही कायम आहे.
सोमवार दि.२१ ऑगस्ट पासून मान्सूनच्या श्रावण सरी पुन्हा उर्जीतावस्थेत येऊन त्यापुढील ३ आठवडे म्हणजे रविवार दि. १० सप्टेंबर पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा, जोरदार तर नव्हे पण काहींश्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

सध्याच्या ‘ पाऊस-खण्ड ‘ प्रणालीमुळे महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता निर्माण झाली असुन येणाऱ्या रब्बी हंगामाची भिस्तही ह्याच २१ ऑगस्ट नंतर पडू शकणाऱ्या अपेक्षित पावसावरच अवलंबून असु शकते, असे वाटते.
लघु पल्ल्यातील पावसाच्या मासिक अंदाजानुसार ऑगस्ट व सप्टेंबर च्या २ महिन्यात महाराष्ट्रात तसेही सरासरीपेक्षा कमीच पावसाच्या शक्यतेचे भाकीत असुन केवळ सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अश्या ६ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील ‘ खनून ‘ तर जपान किनारपट्टीवरील ‘ लान ‘ नावाच्या दोन चक्रीवादळानीं (टायफुन) खेचल्यामुळे देशातील दक्षिणेकडील ५ राज्याबरोबर महाराष्ट्रातही ह्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप पाहवयास मिळत आहे.

सध्या दोनपैकी एक टायफुन विरळले असुन दुसरेही विरळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे म्हणून तर ‘ मान्सून-खण्ड ‘ प्रणाली नामशेष होणे व ‘ मान्सून आस ‘ त्याच्या मूळ सरासरी जागेवर प्रस्थापित होणे अश्या ह्या शक्यतेमुळेच आपल्याकडे २१ ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता वाढली आहे.

इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here