‘फाळणी वेदना स्मृतिदिना ‘ च्या पव्यक्त केला निषेध
सावंतवाडी । प्रतिनिधी : देशाच्या फाळणीच्या दिवशी हजारों नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्याच वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे फाळणीचा वेदनादायी दिवस म्हणून सावंतवाडी शहरात निषेध मुक मोर्चा काढण्यात आला.
शहरातील भाजप कार्यालय ते गांधी चौकपर्यंत हातात तिरंगा घेऊन निघालेल्या या ‘मुक मोर्चा ‘ त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच सावंतवाडीकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, गुरूनाथ पेडणेकर, दादू कविटकर, शर्वाणी गावकर, दिनेश सारंग, पंकज पेडणेकर, दिलीप भालेकर, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, संदीप हळदणकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे,बांदा सरपंच प्रियांका नाईक, दिपाली भालेकर,गुरू मठकर, शक्ती व बुथ अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांनी सहभाग घेतला होता.
भारतावरील ब्रिटीश राजसत्ते अंमल दूर करून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी प्रतिकार केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून अखेर १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता म्हणजे १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. याचवेळी अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हा नवा देश उदयाला आला. अखंड भारताचे नागरिक असलेले भारतीय या फाळणीमुळे नव्याने उदयाला आलेल्या पाकिस्तानचे नागरिक झाले. ही फाळणी होत असताना झालेल्या राजकीय आणि ऐतिहासिक घटना देशाच्या नागरिकांच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या ठरल्या. यात अनेक कुटुंबे बेघर झाली. दोन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी प्राण गमावले. सुमारे दीड कोटी नागरिक हे विस्थापित झाले होते. या वेदनेची स्मृती म्हणून १४ ऑगस्ट रोजी ‘फाळणी वेदना स्मृतिदिन ‘ म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला. त्यानुसार सावंतवाडी शहरात भाजपने हा निषेध मुक मोर्चा काढला.