हरयाणाच्या नूंहमध्ये गोतस्कराचा पोलिसांवर गोळीबार

0
122
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

हरयाणाच्या नूंह येथे गेल्या काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळला होता. आता तिथली परिस्थिती काहीशी पूर्ववत होताना दिसत असली तरी तिथल्या गुन्हेगारी जगात पोलिसांची भीती अजिबातच नसल्याचं दिसून आलं आहे.

नूंहमध्ये गोतस्करांचा सुळसुळाट झाला असून त्यातील काहींनी ट्रॅफिक पोलिसांवर गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

नूंह जिल्ह्यात शनिवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोतस्कर एका कँटरमधून काही गायी-बैल यांची तस्करी करत होते. हे वाहन दिल्ली-मुंबई महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गोतस्करांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली.

या गोळीबाराला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यात एक गोतस्कर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तौफिक असं या तस्कराचं नाव असून तो पलवल जिल्ह्यातील उटावड गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 21 गुरांना मुक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here