पुण्यात 10 किमी जाण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक कालावधी लागणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

0
57
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुण्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चांदणी चौकातील पुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात ते म्हणतात, “पुणे आणि नागपूर यांच्यामध्ये सर्वात प्रथम पुण्याची मेट्रो मंजूर झाली. या प्रकल्पासाठी नितीनजी गडकरी यांनी निधी देण्याची तयारी दर्शवली. पण प्रश्न होता तो अधिग्रहणाचा तो प्रश्न पीएमसीच्या सहाय्याने सोडवला गेला. आता पुण्यात मेट्रोचं जाळं होण्याकडे वाटचाल सुरू आहे. पुण्यातील वाहतूककोंडी हा देखील कळीचा मुद्दा आहे. पुण्याच्या बाहेरून पुण्यात येण्यासाठी लागणारा वेळ हा कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी पुण्यात डबलडेकर फ्लायओव्हर उभारण्याची योजना सुरू आहे.” येत्या काळात पुण्याची ओळख वाहतुकीची कोंडी नसलेले शहर अशी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील.

अजितदादा सारखा नेता सोबत असेल तर…
“पुरंदरमधील नवीन विमानतळासाठी केंद्राच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. आता फक्त कमतरता आहे ही भूमीअधिग्रहणाची . अजितदादांच्या मदतीने पुरंदरमधील नवीन विमानतळासाठी यासंबंधी लवकरच काम सुरू होईल.” यापुढे ते म्हणतात, “पुण्याविषयी प्रेम असलेला अजितदादांसारखा नेता सोबत असल्याने पुण्याचा विकास जोमाने होईल यात शंका नाही.”

पंतप्रधान मोदी यांचं पुण्यावर विशेष प्रेम
पंतप्रधान मोदी यांच्या पुणेप्रेमाविषयी बोलताना फडणवीस म्हणतात, ” पंतप्रधान मोदीजी यांचं पुण्यावर विशेष प्रेम आहे. आपल्या कार्यकाळात पुण्याला जास्त वेळा भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान असावेत. त्यांच्या येण्याने पुण्याच्या गतीला चालना मिळेल. आगामी कालावधीतही त्यांचे पुण्याला काही प्रस्तावित दौरे आहेत.”

चांदणी चौक म्हणजे दिवसा चांदण्या…
यादारम्यान आपल्या भाषणात चांदणी चौकाच्या नावावरुन मजेशीर टिप्पणीही केली. ते म्हणतात, ” पुणेकरांना पुलावरील ट्राफिक जॅममुळे दिवसाही चांदण्या पाहायला मिळत होत्या. म्हणून या चौकाला चांदणी चौक असं नाव पडलं, असं मला आधी वाटलं होतं. पण दादांमुळे मला या पुलाविषयी माहिती समजली.

:

अडचणींवर मात करत चांदणी चौकातील पुलाचे काम केलं : नितीन गडकरी

अर्थमंत्री म्हणून मी राज्यातील कोणत्याही प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, तुम्हाला काय त्रास? आपल्या अधिकारांवर अजित पवार ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here