अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले फडणवीस ?

0
147
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

तर, यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीची कोणतेही माहिती आपल्याकडे नसल्याचं फडणवीस म्हणाले आहे. फडणवीस हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, चिखलठाणा विमानतळावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

“अजित पवार आणि शरद पवर यांच्या भेटीबाबत मला काहीही माहित नाही. याच कोणताही तपशील माझ्यकडे नाही. त्यांची भेट झाली, नाही झाली किंवा किती वेळ झाली या संदर्भात कुठलेही माहिती माझ्याकडे नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला याबाबत काहीही माहित नाही. जर उद्या असेल तर नक्की कळवतो,” असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांची सावध भूमिका…

काल जयंत पाटील यांच्यासह शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. मात्र, असे असताना अजूनही राष्ट्रवादीत कोण कोणासोबत आहे, यावरुन संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याने यावरुन वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पवारांमध्ये झालेल्या भेटीबाबत मला काहीही माहित नसल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले आहे.

फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असून, महाआरोग्य शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी फडणवीस हे आज शहरात आले आहेत.

Ajit Pawar : अशी घेतली अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त भेट, जाणून घ्या दिवसभरातील घटनाक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here