“महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना माझ्याकडून चूक झाली…”; नितीन गडकरी असं का म्हणाले?

0
36
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणेकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. चांदणी चौक पुणेकरांच्या सेवेत सज्ज झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पूलाचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

दरम्यान नितीन गडकरी यांनी ते महाराष्ट्र बांधकाम मंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला.

नितीन गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पावर हजार कोटी खर्च झाले आहेत. पण या मार्गावर १ लाख ५५ हजार Passenger car units ट्रॅफीक आहे. पण मी नेहमी म्हणतो माणसाने चूक केली की ते स्वीकारली पाहिजे. माझ्या हातातून चूक झाली होती कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात.

मी जेव्हा महाराष्ट्रात बांधकाम मंत्री होतो. तेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग बांधल्यानंतर पुण्यातील सात महानगरपालिकेचे रस्ते मी बांधले होते. त्यावेळी हा वेस्टर्नली बायपास ( जुना चांदणी चौक) मी बांधला होता. हा बांधत असताना याचे डिझाईन पुढेचे २० ते २५ वर्ष बघून करायला पाहिजे होत. ते न केल्यामुळे सर्व्हीस रोड देखील बरोबर नव्हते. उड्डाणपूल देखील नव्हते, असे नितीन गडकरी म्हणाले.

One Day Trip Near Pune : पुण्याजवळची विकेंड वन डे ट्रिपसाठी परफेक्ट अशी 5 ठिकाणं
त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढत आहे. पुण्यात वाहणांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफीकची समस्या देखील निर्माण झाली आहे. जस हार्टमध्ये चोकप झालं की आपण बायपास करतो. मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करिता नवीन टनल बांधा मग प्रश्न सुटेल. मात्र तरी देखील समस्या सुटली नाही, असे गडकरी म्हणाले. (latest marathi news)

Chandni Chowk Inauguration: “नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, सर्व सोंग करता येतात पण…”; अजित पवारांनी केले कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here