भारतातील 2023 स्पर्धेपर्यंत फिट होणार का? विलियम्सन म्हणतो, ‘सध्यातरी फक्त वेळ…’

0
50
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता दोन महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेच्या अंतिम तयारीला सर्वच सहभागी संघांची तयारी सुरू झाली आहे.

यादरम्यान केन विलियम्सन न्यूझीलंडकडून या स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. आता याबद्दल विलियम्सननेच प्रतिक्रिया दिली आहे.

विलियम्सन मार्चच्या अखेरीस आयपीएल 2023 मधील पहिलाच सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. त्यातून आता तो सावरत आहे. दरम्यान, त्याने आता सरावाला सुरुवात केली आहे.

विंडिजविरुद्ध पराभव : World Cup 2023 तोंडावर आलेला असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारे 3 फॅक्टर
याचदरम्यान, विलियम्सनने वर्ल्डकप सहभागाच्या शक्यतेबद्दल बे ओव्हल येथे पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले, ‘वर्ल्डकपमध्ये खेळणे नेहमीच खास असते. पण सध्यातरी फक्त वेळ आणि दिवसांबद्दल अंदाजच बांधले जाऊ शकतात.’

‘अजून बरेच काम करणे बाकी आहे. फिजिओ, सपोर्ट स्टाफ आणि न्यूझीलंड क्रिकेटसह मी प्रक्रियेला सामोरा जात आहे. हे कठीण आहे. कारण तुमच्यासाठी काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस विरुद्ध असतात.’

तथापि, विलियम्सनने वर्ल्डकपमधील सहभागाबद्दल आशा असल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला, ‘वर्ल्डकप सारख्या गोष्टींचा विचार नेहमीच मनामध्ये असतो, ज्यामुळे प्रेरणा मिळते आणि तुम्हाला तुमच्यात सुधारणा झाल्याचे पाहायचे असते.’

जर विलियम्सन न्यूझीलंडकडून वर्ल्डकपमध्ये खेळला, जर संघासाठी ही सकारात्मक गोष्ट असेल. तो 2019 वर्ल्डकपमध्ये मालिकावीर ठरला होता. लक्षात घेण्यासारखी गोष्टी अशी की 2023 वर्ल्डकप स्पर्धेत सलामीचा सामना 5 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातच खेळवला जाणार आहे.

World Cup 2023 साठी ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ जाहीर! लॅब्युशेनला वगळंल, दोन खेळाडूंच्या निवडीने केलं सरप्राईज
असा रंगणार वर्ल्डकप 2023

ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here