भाजपचे आदेश, नगरसेवकांनो बंद कार्यालय उघडा; उमेदवारी देताना घेणार नोंद

0
48
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर – पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने कार्यालय बंद करून आराम करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना कार्यालय उघडण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना विचार केला जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेचा कार्यकाळ वर्षभरापूर्वी संपला आहे. तेव्हापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. अधिकार संपुष्टात आल्याने नगरसेवकांनीही काम बंद केले आहे. सध्या जनतेला काही समस्या असल्यास थेट महापालिका कार्यालयासोबत संपर्क साधावा लागत आहे. प्रत्येकजण कार्यालयात पोहचू शकत नाही.

तक्रारीनंतर समस्या सुटेलच याचीही खात्री नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. नगरसेवक काहीच कामाचे नसल्याचा त्यांचा समज झाला आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची भीती भाजपला सतावत आहे. महापालिकेची निवडणूक केव्हा होईल याची कुठलीच शाश्वती नाही.

Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी-माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवा; अजित पवार यांचा आदेश
नगरसेवकांनो, बंद कार्यालय उघडा

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यायचा आहे.

महाविकास आघाडीने केलेली प्रभागरचना महायुतीचे सरकार येताच बदलण्यात आली आहे. सोबतच नगरसेवकांची संख्याही वाढवण्याच्या मुद्द्यावर न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. या प्रकरणाचे निकाल डिसेंबरच्या आत लागले नाहीत तर लोकसभेनंतरच महापालिकेची निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते सुस्तावले आहेत.

Mumbai : भिवंडी सीरिया करण्याचा कट! तपासात धक्कादायक खुलासा
अनेकांनी कामे बंद केली आहेत. जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा बघू असा विचार अनेकांनी केला आहे. भाजपतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. कार्यकर्त्याला स्वस्थ बसू देत नाही.

त्यात पुन्हा महापालिकेची कामे ओढावून घेण्यास कोणी फारसे उत्सुक नाहीत. मात्र आता पक्षाचा आदेशच आल्याने माजी नगरसेवक आणि महापालिकेसाठी इच्छुक असलेल्यांना पुन्हा सक्रिय व्हावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here