नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत ‘वॉर रूम’मध्ये आढावा बैठक घेतल्याचे समोर येताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली असून हा प्रकार म्हणजे सरकारमधील शीतयुद्ध असल्याचा दावा केला आहे.वडेट्टीवारांना पक्षाने नागपूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाची स्थिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक नेमले आहेत. त्यांनी शुक्रवारी नागपुरातील रविभवन येथे नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार यांना वरचढ होऊन काम करण्याची सवय आहे. त्यांच्या खात्याचा काहीही संबंध नसताना तसेच त्यांना अधिकारही नसताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’मध्ये बैठक घेतली. हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. हा प्रकार काल झालेल्या मंत्रालयातील बैठकीतून सगळ्यांनी बघितला. यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत. ही नाराजी ते कुठे व्यक्त करू शकत नसल्याने ते राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शेतावर गेले आहेत, असा टोलाही वडेट्टीवार यांनी हाणला.
Home ताज्या बातम्या अजितदादांवरील नाराजी लपवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे शेतावर गेले काय”, विजय वडेट्टीवार यांचा टोला,...