अन् सरन्यायाधीश चंद्रचूड तडकाफडकी न्यायालयातून निघून गेले, नक्की काय घडलं?

0
214
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज सर्वोच्च न्यायालयातून अचानक निघून गेले. वैयक्तिक कारणामुळे ते सर्वोच्च न्यायालयातून तातडीने निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी यामागील कारणही स्पष्ट केले.

शुक्रवारी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड नेहमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात आले. आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी होणार आहे. मात्र काही वेळातच सरन्यायाधीश आपल्या आसनावरून उठले आणि निघून गेले.

घरी काहीतरी समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी एक वाजेपर्यंत परत येण्याचा प्रयत्न करेन असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘लाईव्ह लॉ’ या न्यायालयीन घडामोडींच्या माहिती देणाऱ्या ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here