अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. इन्टाग्रामवरून स्वानंदीनं आपल्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ हे पोस्ट केले होते.
यावेळी तिच्या फोटोंना आणि व्हिडीओला सोशल मीडियावरून चांगलेच लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. स्वानंदीनं 20 जूलै रोजी आपल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता त्यावेळी तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. स्वानंदी लवकरच संगीतकार आशीष कुलकर्णी ह्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आशीषनं अनेक चित्रपट-मालिकांना संगीत दिले आहे. सोबतच त्यानं इंडियन आयडॉलमध्येही भाग घेतला असून अनेक रिएलिटी शोमध्येही भाग घेतला होता. त्यामुळे या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसली. आता स्वानंदीनं आपल्या साखरपुड्याचे Unseen फोटो शेअर केला आहे. तेव्हा तुम्ही तिचे हे फोटो पाहिलेत का?
स्वानंदीचे हे कॅन्डिड फोटो आहे. ज्यात तुम्हाला सर्वांचेच आनंदी, हसतखेळत फोटो दिसतील. यावेळी या फोटोंमधून स्वानंदी, स्वानंदीची आई आरती अकंलीकर-टिकेकर, स्वानंदीचे वडील उदय टिकेकर, आशिष कुलकर्णी आणि आशीष कुलकर्णीचे आईवडील यांचे फोटो दिसतील. यावेळी त्यांच्या या कॅन्डिड फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले ते म्हणजे सासू-सासरे आणि जावयांभोवती. यावेळी स्वानंदीच्या सासूसासऱ्यांचीही चांगलीच चर्चा रगंलेली आहे. सोबतच यावेळी उदय टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचाही एक गोड फोटो आहे. तसेच स्वानंदीनंही आपल्या सासू-सासऱ्यांसोबत एक गोड फोटो क्लिक केला आहे. सोबतच स्वानंदी आणि आशिष रोमॅण्टिक कॅन्डिड फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. परंतु यावेळी सर्वात चर्चेत होतो तो फोटो म्हणजे उदय टिकेकर यांचा आपल्या जावयासोबतचा फोटो.
हेही वाचा – नयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही
स्वानंदी टीकेकर हिनं ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून मराठी मालिकांमधून काम ंकरायला सुरूवात केली होती. ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिनं मराठी इंडियन आयडॉल हा शो होस्टही केला होता. सध्या स्वानंदीच्या साखरपुड्याचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
स्वानंदीचे वडील उदय टिकेकर हे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्याचसोबत तिची आई आरती अंकलीकर-टिकेकर या लोकप्रिय गायकिा आहेत. सध्या त्यांच्याया फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.