नयनतारावर भाळलास? शाहरुखनं असं उत्तर दिलं, की पुन्हा असं काही विचारण्याचं धाडसच होणार नाही

0
74
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

शाहरूख खान हा आपल्या सर्वांचाच फारच आवडता अभिनेता आहे. सोशल मीडियावरही शाहरूख खानची चर्चा रंगलेली असते. त्यातून शाहरूखच्या चाहत्यांना आता आतुरता आहे ती म्हणजे त्यांच्या आगामी चित्रपटाची.

यावर्षी आलेल्या शाहरूख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून यावर्षीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. त्यातून सध्या शाहरूख खानचा ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ट्विटरवर एक ट्रेण्ड व्हायरल होताना दिसतो आहे. #Asksrk हा ट्रेण्ड चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी शाहरूख खाननं ट्विटरवरून एक ट्रेण्ड व्हायरल केला आहे. ज्यात त्यानं Ask SRK असं म्हटलं आहे. यावेळी त्याला नेटकऱ्यांनी प्रश्न विचारली आहेत. तेव्हा याच Q and A च्या सेशनमध्ये अशाच एका नेटकऱ्यानं दाक्षिणात्त्य सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा हिच्याबद्दल एक प्रश्न विचारला आहे.

इन्टाग्रामवर जसे आपण Ask Me Anything चे सेशन भरतो तसेच बॉलिवूडी सेलिब्रेटीही भरवतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेता येता. अशाप्रकारे सेलिब्रेटींना त्यांच्या चाहत्यांशीही अधिक संवाद हा साधता येतो. सध्या शाहरूखनंही असंच एक सेशन आपल्या ट्विटर अकांऊटवरून भरवले होते. त्यानं आपला Ask SRK हा हॅशटॅग व्हायरल केला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी चाहत्यांच्या निवडक प्रश्नांना त्यानं उत्तर दिले होते. यावेळी चाहत्याच्या एका प्रश्नावर मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले होते. परंतु या प्रश्नाला शाहरूखनं मस्त उत्तर दिलं आहे. ते ऐकून तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा – Gadar 2 पाहून प्रेक्षकांनी दिल्या एका शब्दातच प्रतिक्रिया, समजून घ्या Public Review

यावेळी एका चाहत्यानं त्याला विचारले आहे की, ‘नयनतारा मॅमवर तुम्ही कधी लट्टू झालात का कधी?’ त्यावर शाहरूख खाननं दिलेलं उत्तरं ऐकून तुम्हालाही हसू झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रश्नावर शाहरूख खान म्हणाला की, ‘अरे गप; त्या दोन मुलांच्या आई आहेत’ त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे आणि प्रश्न विचारलेल्या नेटकऱ्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट संपुर्ण भारतात आणि जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here