स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर….

0
153
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मंगळवारी म्हणजे 15 ऑगस्टला आपल्या देशाचा 76 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त  देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातही (Maharashtra) मोठ्या उत्साहात देसाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, यावर राज्य सरकारनं मार्ग काढला असून, कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे.

राज्य सरकारनं पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण…

कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार

जिल्हाधिकारी रायगड – रायगड
जिल्हाधिकारी हिंगोली – हिंगोली
जिल्हाधिकारी वर्धा – वर्धा
जिल्हाधिकारी गोंदिया – गोंदिया
जिल्हाधिकारी भंडारा – भंडारा
जिल्हाधिकारी अकोला – अकोला
जिल्हाधिकारी नांदेड – नांदेड

इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला दीर्घ काळ संघर्ष करावा लागला. यासाठी अनेकांनी लढा दिला, अनेकांनी सरकारच्या अत्याचारांना तोंड दिले, अनेकांना दुखापतग्रस्त झाले, अनेक जण शहीद झाले, अनेकांनी हसतमुखाने फाशीवर गेले आणि मृत्यूला मिठी मारली,.तर अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य, आपली संपूर्ण तारुण्य घालवले. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्रांच्या त्याग आणि बलिदानामुळेच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here