मुंबई :क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. (Ind vs Pak World Cup 2023 Tickets) ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप थरालाला सुरूवात होणार असून त्याआधी आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
संपूर्ण वर्ल्ड कपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना असलेल्या भारत-पाक सामन्याच्या तिकिटांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
‘या’ तारखेपासून मिळणार सामन्याची तिकिटे
भारत-पाक सामन्याची तारीख बदलली असून 15 ऑक्टोबरला होणारा सामना एक दिवस आधीच म्हणजेच 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे. वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटांबाबतची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. 25 ऑगस्टपासून चाहत्यांना टीम इंडिया सोडून इतर सर्व सामन्यांची तिकिटे उपलब्ध होणार आहेत.
गुवाहाटी आणि त्रिवेंद्र इथे होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्टपासून बुक करता येणार आहेत. 31 ऑगस्टपासून चेन्नई, दिल्ली आणि पुण्यामध्ये होणऱ्या सामन्यांची तिकिटे बुक करता येणार आहेत. तर 2 सप्टेंबरपासून बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांचे बुकिंग चाहत्यांना करता येईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 3 सप्टेंबरपासून बुक करता येणार आहेत.
आयसीसीने केलेले ट्विट-
टीम इंडियाचा पहिला सामना पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नई तर 11 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये दुसरा सामना, सर्व जगातील क्रिकेट चाहते सामन्याची वाट पाहत असतात तो हाय व्होल्टेज सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.