2019 नंतर ‘या’ राज्यांमध्ये भाजपचा पराभव; आगामी लोकसभा निवडणुकीवेळी काय असेल परिस्थिती? पाहा आकडेवारी

0
96
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) बाबत भाजपसमोर मोठं आव्हान आहे. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता आगामी लोकसभा निवडणुकीत याच राज्यांमध्ये भाजपच्या विजयाची किती शक्यता आहे? हे जाणून घेण्यासाठी INDIA TV-CNX नं नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणातून काय निष्कर्ष समोर आलाय? हे सविस्तर जाणून घेऊयात…

2019 नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पश्चिम बंगालचे निकाल तर सर्वात धक्कादायक होते. येथे पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

NDA ला यंदाच्या लोकसभेत किती जागा मिळण्याची शक्यता?

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांतील खराब कामगिरीनंतरही 2024 च्या लोकसभेत भाजप आघाडीला (NDA) पराभव पत्करावा लागल्याचं दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात पुढील सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएला एकूण 48 पैकी 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधकांच्या INDIA ला देखील समान 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

गेल्या 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकहाती 23 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, झारखंडबद्दल बोलायचं झालं तर, या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 14 पैकी 13 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपनं 11 जागा जिंकल्या होत्या.

दिल्ली, पंजाबमध्ये बदल पाहायला मिळू शकतो

सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकीतही दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. 2024 च्या निवडणुकीत भाजपला दिल्लीत 5 जागा मिळत आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला जोरदार धक्का बसणार आहे. 2024 च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी भाजपला केवळ 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

येथे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी इंडियाला मोठा फायदा होत आहे. येथे इंडियाला 30 जागा मिळतील असं दिसतंय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं एकहाती 18 जागा जिंकल्या आहेत. दिल्लीत दमदार कामगिरी करताना लोकसभेच्या सातही जागा जिंकून त्यांनी विरोधकांचं कंबरडं मोडलं होतं.

हिमाचलमध्येही भाजपला झटका बसणार

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवर विश्वास ठेवला तर हिमाचल प्रदेशातही भाजपला धक्का बसू शकतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि इंडियाला 1 जागा मिळणं अपेक्षित आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2019 मध्ये भाजपनं लोकसभेच्या चारही जागा काबीज केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतही भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपनं 25 तर काँग्रेसनं 40 जागा जिंकल्या होत्या.

India Tv CNX Survey: भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार? विरोधकांच्या INDIA ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here