रजनीकांत यांचा ‘जेलर’ पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं

0
25
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसत आहेत.

थलैवाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर खूप गर्दी केली. या चित्रपटाला पाहण्यासाठी फक्त सर्वसामान्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आतुर आहेत. चित्रपटासाठी तब्बल 35 कोटींची आगाऊ बूकिंग देखील झाली आहे. रजनीकांत याचा चित्रपट पाहणार का असा सवाल एका नेटकऱ्यानं बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला केला आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

नेहमी प्रमाणे शाहरुख खान यानं आस्क एसआरके हे सेशन घेतलं. त्यावेळी शाहरुखला अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यापैकी एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला की तू जेलर पाहशील का? त्यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला की ‘हो नक्कीच… मला रजनी सर… माससससस! ते जवानच्या सेटवर आले होते आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद देखील दिले.’ शाहरुखच्या या ट्वीटनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यानं केलेल्या या ट्विटनं प्रेक्षक त्याची स्तुती केली आहे. सगळे त्याच्या पोस्टवर कमेंट करत रजनीकांत सुपरस्टार असं म्हणत आहेत.

दरम्यान, ‘जेलर’ हा चित्रपट पहिल्या दिवशी 20 कोटी रुपयांचा गल्ला करू शकतो. तर ग्लोबल कनेक्शन विषयी बोलायचे झाले तर त्याची 70 ते 80 कोटी कलेक्शन करेल असे म्हटले जाते. आता नक्की हा चित्रपट किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी जपानी कपल चेन्नईत आलं आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा :Avenger Endgame मधील ‘या’ व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!

रजनीकांत यांच्या जेलरची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलीच क्रेझ आहे. जेलर कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला मागे टाकेल असे म्हटले जाते. पठाण यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या पठाणनं ओपनिंगच्या दिवशी जगभरात 106 कोटींची कमाई केली. तर भारतात 53 कोटींची कमाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here