राहुल गांधी यांचं भाषण की कॉमेडी सर्कस ? यांना राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं का?; नितेश राणे यांचा घणाघात

0
103
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सिंधुदुर्ग : राहुल गांधी यांचं कालचं भाषण सध्या चर्चेत आहे. तसंच या भाषणादरम्यानची त्यांची कृतीही चर्चेत आली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.

यावरुन काल संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आज ठिकठिकाणी भाजपने मोर्चे काढले आहेत. राहुल गांधी यांच्या कृतीवर आक्षेप नोंदवला जात आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबई महिलांनी आंदोलन केलं. तर सिंधुदुर्गात भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

राहुल गांधी यांचं संसदेत काल जे भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. एका महिला सदस्याला फ्लाईंग किस देणं कितपत योग्य आहे? ज्यांना महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं योग्य वाटत त्याला काय म्हणायचं? राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का?, असं नितेश राणे म्हणालेत.

राहुल गांधी फ्लाईंग किस प्रकरणावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजप कशाचं प्रदर्शन करेल हे माहीत नाही. राहुल गांधी यांनी देशासाठी जादूचा फ्लाईंग किस दिलं. भारत जोडो यात्रेत अनेक असे फ्लाईंग किस त्यांनी दिले होते, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी पलटवार केलाय. संजय राऊतला फार प्रेम कळतं. महिलांना अश्लिल शिव्या घालतो त्यांच्या घराबाहेर कुत्रे ठेवतो. अमित शाहा यांच्या भाषणानंतर चिडचिड नेमकी कोणाची झाली हे आज सकाळच्या पत्रकार परिषदेत दिसली, असं नितेश राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here