नितीन देसाई त्यांच्यावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार,मराठी सिनेकलावंताना अश्रू

0
328
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : आर्ट डायरेक्टर (Art Director) नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करून त्यांची जीवनयात्रा संपवली. त्यांच्यावर आज त्यांनी उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) अंत्यसंस्कार करण्यात आले.

याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यविधाली मराठी सिनेकलावंतानी मोठी गर्दी केली होती.मात्र, बॉलिवूडच्या कलावंतानी याकडे पाठ फिरवली.

चित्रपटसृष्टीतील दिग्गज आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 2 ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर सिनेसृष्टी हादरून गेली होती. मराठमोळे आर्ट डायरेक्टर असलेले नितीन देसाई यांनी मराठीसह हिंदीमधील ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझायन केले होते. त्यामुळे त्यांचे बॉलिवूडकरांशी घनिष्ठ संबंध होते. मात्र आज त्यांच्यावर करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला याच बॉलिवूडकरांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मराठी सिने कलावंताना घेतले अंत्यदर्शन

अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधून फक्त मधुर भांडारकर यांनीच पार्थिवाचे दर्शन घेतले. मात्र यावेळी संपूर्ण मराठी सिनेसृष्टी एकवटलेली दिसली. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अविशान नारकर, मानसी नाईक, माधव देवचाके, अभिजित केळकर अशा अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांचे अंत्यदर्शन घेतले.

सुबोध भावेंला अश्रू अनावर

खऱ्या आयुष्यातील कलाकृतीची हुबेहूब प्रतिकृती तयार करणं, हेच त्यांचं कसब होतं. बालगंधर्व चित्रपट करताना नितीन देसाई आणि सुबोध भावे हे दोघे अनेक क्षण एकत्र जगले. पण नितीन देसाई यांचं असं अचानक निघून जाणं सुबोध भावेसाठी धक्का देणारं ठरलं आहे. सुबोध भावेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन देसाई यांच्याबद्दल बोलताना त्याचा कंठ दाटून आला.

चौकशी करण्याचे आश्वास

नितीन देसाई यांची ही आत्महत्या नसून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला. नितीन देसाई यांनी आत्महत्येआधी काही ऑडिओ क्लिप केल्या आहेत. यामध्ये त्यांनी एडलवाईज या कंपनीवर आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेमध्ये आमदार आशिष शेलार यांच्याकडून तर विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी या आत्महत्येच्या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली. ज्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here