माजी क्रिकेट व्यवस्थापक ‘सुनील देव’ कालवश

0
140
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भारतीय क्रिकेट वर्तुळात भरीव योगदान दिलेले माजी क्रिकेट व्यवस्थापक सुनील देव यांचे नुकतेच येथे निधन झाले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील 2007 सालच्या टी-20 विश्‍वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते.

ते 75 वर्षांचा होते.

1970 सालापासून 2015 सालापर्यंत ते दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य होते. तसेच ते बीसीसीआयच्या विविध उपसमित्यांचेही सदस्य होते. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ते प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून भारतीय संघाबरोबर होते.

यानंतर ते 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापकही होते. सर्वप्रथम 1996 मध्ये त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशासकीय व्यवस्थापक म्हणूनही पाठवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here