‘ज्ञानवापी’चं सत्य समोर आणण्यासाठी वापरलं जाणार ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’

0
162
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद सध्या चर्चेत आहे. याठिकाणी मशीद आहे की शिवलिंग हे तपासण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या तपासासाठी उत्खनन न करता, पुरातत्व विभाग एक विशेष तंत्रज्ञान वापरणार आहे.

तपासासाठी उत्खनन केल्यास मशिदीच्या संरचनेचे नुकसान होईल या भीतीने मुस्लीम पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. परंतु एएसआयने उत्खननास नकार दिला नाही; तर उत्खनन आवश्यक असल्यास ते न्यायालयाची परवानगी घेऊन करू, असं स्पष्ट केलं. आता प्रश्न असा आहे की एएसआयचे पथक उत्खनन केल्याशिवाय तपास कसा करणार?

ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार

जमीन न खोदता त्याच्या आत काय दडलंय याविषयी अचूक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारचा वापर करतात. हे एक अतिशय उपयुक्त तंत्र आहे आणि जगभर त्याचा वापर केला जातो. भारतात देखील ते ASI आणि सैन्याद्वारे वापरले जाते.

देशातील बाकी एजन्सीज गरज पडेल तेव्हा त्याचा वापर करतात. त्याचे परिणाम अतिशय अचूक असल्याचे आढळून आले आहे. एएसआय ज्ञानवापीमध्येही हेच तंत्र वापरणार आहे, ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर येईल. (National News)

काय आहे प्रकरण?

मुघल शासक औरंगजेबाने याठिकाणी असलेलं विश्वेश्वर मंदिर पाडून मशीद बांधल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात मशिदीत शिवलिंग आढळून आले होते. हल्ल्याच्या वेळी पुजाऱ्याने हे शिवलिंग आवारात असलेल्या विहिरीत लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

कसं करतं काम?

यामध्ये लॅपटॉप आणि इतर तांत्रिक उपकरणांच्या मदतीने, तज्ञांना जमिनीच्या आत काय लपलेलं आहे हे जाणून घेता येतं. हे सर्व चित्रांच्या माध्यमातून समोर येतं. सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक प्रकारचा स्कॅनर आहे जो जमिनीत लपलेलं सत्य उजेडात आणतो. वैद्यक शास्त्रात ज्या पद्धतीने डॉक्टर सीटी स्कॅनद्वारे रोगाचे मूल्यांकन करतात, पोटात काय आहे आहे याची अल्ट्रासाऊंडद्वारे तपसणी करतात, अगदी त्याच पद्धतीने हे रडार तज्ज्ञांसमोर जमिनीतील सत्य बाहेर आणते.

पोर्टेबल उपकरण

हे एक पोर्टेबल छोट उपकरण आहे. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज जमिनीच्या आत पाठवते. हे रेज जमिनीच्या आतील प्रतिमेच्या स्वरूपात परत येतात. हे यंत्र 15 मीटर खोलपर्यंत सहज माहिती शोधू शकते. अँटिना जमिनीच्या आतील सिग्नलवर आधारित परिणाम देतो. जमिनीच्या आत भिंत किंवा दगड, धातू किंवा आणखी काही असेल तर त्याची माहिती समोर येते.

या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञ एका निष्कर्षापर्यंत पोहोचतात. त्यानुसार पुढील प्रक्रिया निश्चित केली जाते. ज्ञानवापी प्रकरणातही एएसआयने या रडारच्या आधारे खोदकाम न करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे. हा अहवाल आल्यानंतर एएसआयला गरज वाटल्यास उत्खननासाठी स्वतंत्र परवानगी घेतली जाईल.

एएसआय आता कोणत्याही ठिकाणी खोदकाम करण्यापूर्वी या रडारचा वापर करते. त्यामुळे वेळेबरोबरच श्रम आणि पैसाही वाचतो. या रडारचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत.

तंत्रज्ञान जगासमोर कधी आले?

1910 मध्ये गोथेल्फ लेम्बॅच आणि हेनरिक लोबी या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचं पहिलं पेटंट सादर केले होते. 1926 मध्ये हुलसेन बेकने दुसरे पेटंट सादर केले. बेकने हे तंत्र अधिक प्रभावी केले. या रडार किंवा तंत्राने 1929 साली शास्त्रज्ञ डब्ल्यू स्टर्न यांनी हिमनदीची खोली मोजली. नंतर या तंत्रावर अनेक संशोधने झाली, परंतु 1970 च्या सुमारास या तंत्रावर सुरू झालेले काम अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले.

1972 मध्ये अपोलो मिशनमध्येही हे तंत्र वापरले गेले. आज हिरा, सोने, भूजल, माती, खडी म्हणजेच जमिनीत लपलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी याचा वापर केला जात आहे. जमिनीच्या आतील स्फोटके शोधण्यासाठीही लष्कर या तंत्राचा वापर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here