गेल्या काही महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या ४० आमदारांसह ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवली होती. यामुळे याकडे राया नोटीसीवर दोन आठवड्यात असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले होते. असे असताना आता शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने मुदतवाढ मिळावी अशी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती.
यामुळे उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे. याबाबत एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपले म्हणने मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितले आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने अध्यक्षांना नोटीस पाठवून या प्रकरणात काय कारवाई केली याचे उत्तर मागितले होते. यासाठी कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्याची मुदत दिली होती. यामुळे निकालाकडे लक्ष लागले होते.
दरम्यान, ठाकरे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या नोटीसीला वेळेवर उत्तर दिले. शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती.ज्याचे लक्ष लागले होते.