महादेव जानकरांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले,”तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती”

0
216
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबईबई मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपावरील त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यातच आता महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत भाजपा एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती, असा टोला महादेव जानकर यांनी फडणवीस यांना लगावला आहे.प अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना,”देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाबरोबर आल्याने फायदा होईल. पण, भाजपा एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती. भाजपावर टीका करण्याएवढा माझा पक्ष मोठा झाला नाही. भाजपा हा जगातील मोठा पक्ष आहे. माझा पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे,” असे महादेव जानकर यांनी यावेळी म्हटले.

पुढे त्यांनी, “गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी भाजपाबरोबर गेलो होतो. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. पण, आताचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नाही. म्हणून आपण भाजपाच्या मागे लागण्यात अर्थ नाही,” असे महादेव जानकर यांनी सांगितले.

“राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लोकसभेच्या ५४३ जागा लढणार आहोत. काही राज्यांत आमचा विजय होईल. मी स्वत: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी दिल्लीला जाणार,” असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला. “पंकजा मुंडे या भाजपाच्या सचिव आहेत. त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा एवढंच बहिणीला सांगेल. जास्त त्रास होऊ लागल्यावर बहिणीला साडी-चोळी देऊन आणण्यासाठी जाणार,” असेही महादेव जानकर म्हणा तेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here