सचिनच्या नकारानंतरही सीमा धूम्रपान करायची, अनेकदा तर….घरमालकाचा मोठा खुलासा

0
389
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सध्या सगळीकडे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची   चर्चा सुरु आहे. सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या नात्याबद्दल अनेक गोदरम्यान, सीमा आणि सचिन यांच्या नात्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे की, या दोघांमध्ये केवळ प्रेमच नवहते तर अनेकदा वादही झाले आहेत. नोएडातील आंबेडकर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या सीमा-सचिनच्या घरमालकाने हा दावा केला आहे. इतकंच नाही तर सचिन सीमाला मारहाणही करायचा असेही घरमालकाने म्हटलं आहे.

 

सचिन सीमाला बिडी ओढत असल्याने मारहाण करायचा

 

घरमालकाने केलेल्या दाव्यात असं सांगितले की, सीमा आणि सचिन या दोघांमध्ये कधी कधी खूप भांडण व्हायचे. तसेच, सीमा बिडी ओढत असल्या कारणाने सचिनने अनेकदा नकार देऊनही सीमा त्याचं ऐकायची नाही. या कारणावरून सचिनने तिला मारहाणही केली आहे.

 

सीमा पाकिस्तानात परत जाण्यास तयार नाही

 

दुसरीकडे सीमा हैदर वारंवार सचिनवर तिचं खरं प्रेम असल्याचा दावा करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ती पाकिस्तानात जाण्यास तयार नाही. सीमा हैदर आता भारतात तिचे भविष्य शोधण्यात व्यस्त आहे. ती म्हणते, “पाकिस्तानमध्ये माझं भविष्य नाही… तेथे अभिमानाच्या नावाखाली लोकांना मारले जाते… मी बलुच जमातीची आहे. ते मला सोडणार नाहीत.”

 

राष्ट्रपती मुर्मू यांना 38 पानी विनंतीचा अर्ज पाठवला

 

इतकंच नाही तर सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी 38 पानी विनंती याचिकाही पाठवली आहे. यामध्ये तिने मुलांसोबत भारतात राहण्याची परवानगी मागितली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सीमा म्हणाली, “मी आता भारताची सून आहे आणि मला इथेच राहायचं आहे. माझा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.”

 

सीमाने सचिनसाठी घर सोडले, पतीला सोडले, देशही सोडला. आता तिला तिचे संपूर्ण आयुष्य सचिनबरोबर घालवायचे आहे आणि पाकिस्तानला परत जायचे नाही. मात्र, असे असले तरीही तिला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी सातत्याने होत आहे.ष्टी समोर येतायत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here