Video : सुनील शेट्टीसारख्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाईचा कायदा करावा : डॉ. संतोष मुंडे

0
159
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सुनील शेट्टीसारख्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाईचा कायदा करावा : डॉ. संतोष मुंडे

शेतकरीद्रोही सुनील शेट्टीला परळी वैजनाथ येथून टोमॅटो केले पार्सल

परळी वैजनाथ : सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या भावाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून ना. धनंजय मुंडेंच्या प्रेरणेतून डॉ. संतोष मुंडेंच्या पुढाकाराने येथील भाजीपाला मार्केटमध्ये रविवार दि.१६ जुलै रोजी प्रतिकात्मक आंदोलन झाले. यावेळी शेतकरी बांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, रा.काँ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आदी शेतकरी समर्थक उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी शेतकरीद्रोही हजारो कोटींचा मालक सुनील शेट्टीसारख्या वाचाळवीर लोकांना चाप लागावा म्हणून सरकारने कायदा करावा अशी मागणी केली आहे. याबाबत लवकरच राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांना भेटणार असे सांगितले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर बोलतांना टोमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलनं केलीत. जर एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या बाबतीत राजाकरण व्हायला नको. एक महिना टोमॅटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असं म्हणून धनंजय मुंडे यांनी अभिनेता सुनिल शेट्टीला टोला लगावला.

सोबतच राज्यात डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 6 ते 2 रुपये प्रति किलो, मार्च 2023 दरम्यान 11 रुपये प्रति किलो आणि एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान 8 ते 9 रुपये प्रति किलोच्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला यांचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास 15 दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम 54% झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते.

यासर्व बाबींचा विचार करता “केंद्र सरकारने प्रमुख उपभोग केंद्रांना वितरणासाठी विविध राज्यांतून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश Nafed, NCCF ला दिले आहेत. दरम्यान हे टोमॅटो खरेदी करून ज्या भागात दर जास्त आहेत त्या भागात वितरण करण्यास सांगितले आहे” अशी माहिती डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.

या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश आण्णा टाक, रामेश्वर महाराज कोकाटेविधी सेलचे अध्यक्ष मनजीत सुगरे, पद्माकर शिंदे, भरत शिंदे, विठ्ठल साखरे, मदन मुंडे, नंदूकुमार झाडे, लखन कासार, महेश झाडे, सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलिक जाधव, सचिन जाधव, अनिल राठोड, राजाभाऊ राठोड, संजय चव्हाण, ज्ञानोबा चव्हाण, रमेश राठोड, लक्ष्मण चव्हाण, सुग्रीव पवार, राजू राठोड, भगवान जाधव, रावसाहेब चव्हाण, बालू राठोड, मनोज मानधने, राजाभाऊ लव्हारे, संतोष आघाव, विश्वजीत मुंडे, कृष्णा दौंड, लिंबाजी दहिफळे, सोमनाथ गित्ते, दिलीप मकर आदी शेतकरी मित्र उपस्थित होते.

मैकडॉनल्ड्स सारख्या कंपन्या शेकडो रुपयांना एक बर्गर विकतात. टोमॅटोचे भाव वाढले म्हणून टोमॅटो खरेदी बंद करणारे भांडवलदार टोमॅटो किंवा इतर कोणत्या भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यावर त्यांच्या उत्पादनांचे भाव कमी करत नाहीत. त्यामुळे सुनील शेट्टी सारख्या सरंजामीवृत्तीच्या लोकांना वेसण घातलीच गेली पाहिजे असे प्रतिपादन रा.काँ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

सुनील शेट्टीसारख्या नतद्रष्ट लोकांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. जो शेतकऱ्यांचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. त्यामुळे अभिनेता सुनील शेट्टीने वेळीच शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा देशभर त्याला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले असे मनोगत रा.काँ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here