लघुशंकेवरून हटकल्याच्या रागातून गाडी अंगावर घातली, मग एक किमीपर्यंत फरफटत नेले !

0
254
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नवी मुंबई : रेस्टॉरंटसमोर लघुशंका करण्यावरुन हटकल्याच्या रागात अज्ञात लोकांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. मारहाणीनंतर मॅनेजरला गाडीच्या बोनेटवरुन एक किमी फरफटत नेले. नवी मुंबईतील तुर्भे येथे ही धक्कादायक घटनायाप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घडली.तुर्भे येथील म्युझिक बारमध्ये एक तरुण बिअर घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा एक साथीदार गाडीतून खाली उतरला. तो तरुण रेस्टॉरंटसमोरच लघुशंका करु लागला. यावेळी रेस्टॉरंटच्या मालकाने त्याला रोखले. यामुळे तरुणांना राग आला. रागाच्या भरात ते मॅनेजरला शिवीगाळ आणि मारहाण करु लागले. यावेळई एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली.यानंतर दोघेही गाडीत बसले आणि मॅनेजरच्या अंगावर गाडी घातली. यावेळी स्वतःचा बचाव करताना मॅनेजरने गाडीच्या बोनेटवर उडी घेतली. आरोपींनी गाडीच्या बोनेटवर एक किमीपर्यंत मॅनेजरला फरफटत नेले. त्यानंतर मॅनेजर खाली पडला. आरोपी त्याला तिथेच सोडून पळून गेले. यानंतर पीडित मॅनेजरने एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here